मार्गदर्शक परिचय

आ.स.भ. श्री सुनीलदादा चिंचोलकर

आम्हा सर्वांचे सुनील दादा ज्यांनी प.पू. अक्का स्वामी वेलणकर यांना ते हयात असे पर्यंत साधना सप्ताहाला येण्याचे वचन दिले होते आणि ते पाळलेही.

• आ. सुनील दादांचा जन्म १४ मार्च १९५१ रोजी मनमाड येथे झाला.

• बारामती केंद्रातून बी. कॉम. प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले.

• तीन वर्षे वालचंदनगरला शिक्षकाची नोकरी केली. त्यानंतर त्यांनी १९७७ ते १९८८ सज्जनगडावर समर्थ सेवा मंडळाचे व्यवस्थापक व सज्जनगड मासिकाचे संपादक म्हणून काम पाहिले.

• श्रीरामदासस्वामी संस्थानचे सल्लागार आणि समर्थ व्यासपीठाचे अध्यक्ष म्हणूनही जबाबदारी सांभाळली.

• त्यांचे ३० पेक्षा जास्त ग्रंथ प्रसिध्द झाले, प्रत्येक ग्रंथाच्या अनेक आवृत्या निघाल्या.

• हयात असेपर्यंत प्रवचन सेवा. जवळपास आठ हजाराहून अधिक प्रवचने मराठी आणि हिन्दी मधुन केली.

• संत ज्ञानेश्वर, समर्थ रामदास, संत तुकाराम, संत कबीर, संत मीराबाई, योगी अरविंद, स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज, रामायण, भगवद्गीता उपनिषदे, नारदीय भक्तीसूत्रे, ज्ञानेश्वरी, दासबोध अशा विविध विषयांवर त्यांची व्याख्याने झाली आहेत. 

आदरणीय सुनील दादांना मिळालेले पुरस्कार

• समर्थ व्यासपीठाचा शिवसमर्थ पुरस्कार, ओंकार ट्रस्टचा वसुंधरा कृतज्ञता पुरस्कार, रामदासस्वामी संस्थानचा समर्थ रामदास पुरस्कार.

• रामकृष्ण मठ, बाबा महाराज समाधी मंदीर, वेदव्यास प्रतिष्ठान या सारख्या संस्थांशी त्यांचे जिव्हाळयाचे संबंध होते.

• तरूणांमध्ये ते लोकप्रिय व्याख्याते होते.

आदरणीय स.भ. सौ. लीलाताई वसंतराव गाडगीळ

आदरणीय समर्थभक्त लीलाकाकू म्हणजे दा.स.अ. उपक्रमाचे माजी संचालक आदरणीय. स.भ.श्री वसंतराव (तात्या) गाडगीळ यांच्या सुविद्य पत्नी. ज्येष्ठ समीक्षक सौ. लीलाताई म्हणजे दा.स.अ. उपक्रमाचा आधारस्तंभ. कोणतीही शंका असो त्याचे समाधानकारक उत्तर त्यांच्या कडे असे, इतका त्यांचा अभ्यास होता.

• त्यांना प.पू अक्कास्वामींचा २० वर्षे सहवास मिळाला. आ. लीलाताई प. दा. अ. च्या पहिल्या तुकडीतील अभ्यासार्थी. तसेच विदर्भातील पहिल्या समीक्षक.

• दा.स.अ. च्या सुरवातीच्या अभ्यासार्थी आणि प.पू अकास्वामींच्या काळातील समीक्षक असणाऱ्या पंचकन्यामधील प्रमुख.

• सौ. लीलाताईनी दा.स.अ. समीक्षक म्हणून दीर्घकाळ काम पाहिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे ५० अभ्यासार्थींनी २०० स्वाध्याय पूर्ण केले. दा.स.अ. चा पुरवणी अभ्यासक्रम त्यांनी तयार केला. ज्येष्ठ समीक्षक म्हणूनही त्यांनी मार्गदर्शन केले.

• सौ. लीलाताई या प्रभावी भागवतकार, प्रवचनकार, तसेच कीर्तनकार होत्या.

• त्यांची भागवत मकरंद, सज्जनगडावरील सायं उपासना, साधनेची प्रभात, शिवमहीम्न, दत्तात्रेय कवच, दासबोधातील सर्व समांसांचे सार सांगणारा भावसुमनांजली हा ग्रंथ ही पुस्तके प्रसिध्द झाली आहेत.

Language