संचालक परिचय

समर्थभक्त वसंतराव श्रीकृष्ण गाडगीळ

• आ. समर्थभक्त श्री वसंतराव श्रीकृष्ण गाडगीळ उपाख्य तात्यासाहेब यांचा कार्यकाळ १९९८ ते २०१२. परमपूज्य अक्कास्वामींनी त्या हयात असतानाच तात्यांकडे दासबोध सखोल अभ्यास उपक्रमाच्या संचालकपदाची जबाबदारी सोपवली होती.

• त्यांचे जन्मगांव सिताफळ मंडी (हैद्राबाद). तात्या आठ वर्षाचे असताना वडीलांचे छत्र हरवले. मामाकडे राहून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. त्यांचे शिक्षण diploma in civil engineering असे आहे.

• निजामशाहीतच नोकरीची सुरवात झाली, त्यानंतर संयुक्त महाराष्ट्राच्या सुमारास ते महाराष्ट्रात जालना येथे आले त्यानंतर लातूर, धाराशीव, अमरावती, वाशीम, बुलढाणा येथे ही कामानिमित्त त्यांचे राहणे झाले. आसेतू हिमाचल असा प्रवास त्यांनी केला. तात्यासाहेब मोठे कडक शिस्तीचे पण मनाने खूप हळवे होते. आ. लीलाताईं सारख्या अर्धांगिनीची साथ त्यांचे आयुष्य उजळून टाकणारी होती.

• १९९८ मध्ये दासअच्या संचालक पदाची सूत्र हाती घेतली, तेव्हा पासून उपक्रमाला एक वेगळी शिस्त लावली. त्यामुळे आजही दा.स.अ. उपक्रम सगळ्यात वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे.

समर्थभक्त सुहासदादा आगरकर

• आ. समर्थभक्त सुहासदादा आगरकर यांचा दासअ संचालक म्हणून कार्यकाल २०१२ ते २०१८.

• दासअचे वाचस्पतिरूदारधी आदरणीय सुहासदादा प्रभाकरराव आगरकर यांचा जन्म १ जाने १९५४ साली इंचलकरंजी येथे झाला. लहानपणीच पोलीओने शरीराला ग्रासले, पण त्याची खंत न बाळगता कुशाग्र बुद्धीच्या जोरावर अनेक शिष्यवृत्या मिळवत ते बी.कॉम झाले. बँकेत मिळालेल्या नोकरीत मन रमले नाही. ते डिफेन्सच्या अकाउंट्स विभागात स्थिरावले. लग्नानंतर दोन अपत्ये यांच्यात रमलेले सुहासदादा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असल्याने, संघाचे प्रबोधन दायित्व त्यांनी स्विकारले. हे कार्य करत असतांना त्यांची पत्रव्दारा दासबोध अभ्यासचे संयोजक पूजनीय व्दा. वा. केळकर (ती आप्पा) यांचाशी भेट झाली आणि नकळत दासबोध अभ्यासाची ओढ लागली.

•  बंगळुरू मध्ये नोकरीत असतांना त्यांनी १९८८ साली पत्रव्दारा दासबोध अभ्यास पूर्ण केला आणि १९८९ साली दा.स.अ. उपक्रमात प्रवेश घेतला. ते सेवानिवृत्त झाले तेव्हा सामाजिक जाणिवेतून सहा सामाजिक संस्थांना प्रत्येकी ११००० रू. समर्पण निधी दिला.

• सेवा निवृत्तीनंतर त्यांचा प्रवास, मेळावे, शिबीरे यामधुन केलेल्या मार्गदर्शनामुळे त्यांच्या विव्दत्तेची किर्ती सगळीकडे पसरू लागली.

• २००५ ते २०१५ या काळात ते गीताधर्म मंडळाचे विश्वस्त होते.

• याच काळात त्यांनी ‘महाराष्ट्रातील पंथ’ हा ग्रंथ सिध्द केला.

• महाराष्ट्र आणि त्या बाहेरील प्रांतात त्यांनी समर्थ वाङ्मय प्रचार-प्रसारासाठी ३००० पेक्षा जास्त प्रवचने दिली.

• नावाप्रमाणे कायम सुहास्य वदनी असणाऱ्या सुहासदादांचा २८ नोहेंबर २०१८ ला पशुपतीनाथ यात्रा हा पृथ्वीवरचा अंतीम प्रवास ठरला. ‘राघवाच्या अनंत पथावर’ मार्गक्रमण करताना शेवटच्या क्षणी सुध्दा ‘जय श्रीराम’ हेच शब्द त्यांच्या मुखातून बाहेर पडले हेच त्यांच्या ‘वाचस्पतिरुदारधी’ अवस्थेचे द्योतक होय.

सुहासदादांना मिळालेले पुरस्कार

• २००८ साली देशस्थ ऋग्वेदी संस्थेचा काशी विश्वेश्वर पुरस्कार मिळाला.

• २००८ साली गीताधर्म मंडळाचा मोठ्या प्रतिष्ठेचा व्यास हा पुरस्कार मिळाला.

विद्यमान संचालक डॉ. विजय लाड

•  विद्यमान संचालक आदरणीय समर्थभक्त डॉ. विजय वसंतराव लाड ( कार्यकाल २०१८ पासून) आ. स. भ. श्री विजय वसंतराव लाड यांचा जन्म २२ नोव्हेंबर १९६३ रोजी नांदेड येथे झाला. एकत्र कुटुंबात वाढलेल्या विजय लाड यांनी पशु वैद्यक शास्त्राची पदवी मिळवून सुरवातीला मुंबई येथे नोकरी केली. तिथे असतानाच प.दा.अ. हा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर नांदेड येथे पशु वैद्यकीय क्लिनीक उघडून सेवा सुरू केली. त्याच बरोबर रयत रुग्णालय, गुरुद्वारा या ठिकाणीही सेवा दिली.

•  १९९२ पासून समर्थ वाङ्मयाचा सातत्याने अभ्यास सुरू आहे.

•  १९९७ पासुन ग्राहक चळवळीत सक्रीय. संघटन, प्रबोधन मार्गदर्शन यासाठी सतत प्रवास, ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी यांचा निकटचा सहवास.

•  २००८ पासून ग्राहक चळवळीतील पंचायत महाराष्ट्रचे अध्यक्ष म्हणून पदभार.

•  समर्थव्रती ती. सुनीलदादा चिंचोलकर यांचा कृपाहस्त लाभला. त्यांच्याकडूनच अध्यात्मिक क्षेत्रातील कार्यप्रेरणा मिळाली. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ग्रंथलेखन कार्य.

•  ग्राहक पंचायतीचा आचार धर्म, दासबोधातील वाङ्यज्ञ, श्री समर्थकृत आरत्या, ग्राहकची चळवळीतील वर्तनशास्त्र, दासबोध चिंतनसार या ग्रंथांचे लेखन व प्रकाशन.

• श्री समर्थ विद्यापीठ सातारा कार्यकारिणी व अभ्यासमंडळाचे सदस्य आहेत. त्याचप्रमाणे सज्जनगड आणि शिवथर घळीचे नियमित वारकरी आहेत

• भारतीय ग्राहक चळवळ आणि भी समर्थ वाङ्मय कार्यासाठी भारतभर प्रवास आणि प्रवचने.
∙ १० मे २०२० पासून कोरोनाच्या भयावह पार्श्वभूमीवर संपूर्ण समाजाला मानसिक धैर्य देण्यासाठी सातत्याने संतसमागम फेसबुक पेजवर समर्थ वाङ्मय प्रचार, प्रसार करत ज्ञानदानाचे कार्य अव्याहत, अविरत, अखंडपणे तीन वर्ष केले (१० मे २०२० ते ३० जाने. २०२३)

• रामदासी ज्ञानोपासना हे त्यांचे युट्युब चॅनल समर्थ साहित्याच्या प्रचार प्रसारार्थ कार्यरत.

• शिवथरघळ सुंदरमठ सेवा समितीच्या कार्यकारिणी समितीवर ऑक्टोबर २०२३ मध्ये समर्थ सेवा मंडळाकडून विश्वस्त म्हणून नियुक्ती

मिळालेले पुरस्कार

  • २०२२ ला देशस्थ ऋग्वेदी संस्थेकडून काशी केशव दासबोध पुरस्कार.
  • १७ जुलै २०२३ रोजी दासबोध चिंतनसार या ग्रंथाला महाराष्ट्र साहित्य परिषद तर्फे मानाचा कै. मामासाहेब दांडेकर पुरस्कार संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक संत तुकाराम महाराजांचे वंशज डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते जुलै २०२३ महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे येथे प्राप्त झाला.
  • डॉ. निर्मलकुमार फडकुले संत साहित्य पुरस्कार २०२३. अ.भा. साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांच्या हस्ते सप्टेंबर २०२३ मध्ये पुणे येथे दिला.

विद्यमान संचालकांच्या कल्पकते मुळे उपक्रमाच्या संस्थापिका प. पू. अक्कास्वामी वेलणकर यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने ‘दासलीला’ या समर्थ रामदासस्वामी यांच्या ओवीबद्ध चरित्र ग्रंथांचे महाराष्ट्रात आणि त्याबाहेर सहा राज्यात प्रकाशन, तसेच परदेशातही प्रकाशन. असे कल्पक, निर्णयक्षम, कुशल नेतृत्व, अमोघ उत्कृष्ठ वक्तृत्व लाभलेले. मा. श्री विजयदादा लाड या उपक्रमाला संचालक म्हणून लाभले आहेत, म्हणूनच दासबोध सखोल उपक्रम. उर्फ दा.स.अ. फाऊंडेशन मोठ्या दिमाखाने यशस्वी वाटचाल करत आहे .

Language