महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु तुकाराम महाराज, नामदेव महाराज , शांतीब्रह्म एकनाथ महाराज , राष्ट्रगुरू समर्थ रामदासस्वामी महाराज, संत मुक्ताबाई, संत जनाबाई आदि थोर संत येथे होऊन गेले. परमपूज्य अक्का वेलणकर या अशा आत्मज्ञानी संतांपैकी एक! मूळच्या भगवद्भक्त असलेल्या अक्कांचा ओढा घरातील सात्विक वातावरणामुळे अधिकाधिक भक्तीमार्गाकडेच दृढ होत गेला. रोखठोक स्वभाव, सखोल ज्ञानप्राप्तीची तळमळ, कुशाग्र बुद्धिमत्ता, शिस्तप्रियता असे त्यांचे विशेष गुण. त्यांना समर्थ संप्रदायी असलेल्या परमपूज्य भागीरथीबाई वैद्य यांनी अनुग्रहीत केले. पुढे आपल्या सद्गुरूंच्या आदेशाने अक्कांनी तीनशेपेक्षा जास्त भागवत सप्ताह केले. सुमारे ४५ प्रापंचिक महिलांना भागवत कथाकार म्हणून घडवले. त्या पत्रद्वारा दासबोध अभ्यास उपक्रमाच्या अनेक वर्षे केंद्रप्रमुख होत्या. उत्कट साधक निर्माण व्हावे म्हणून १९८४ साली त्यांनी दासबोध सखोल अभ्यासक्रमाची निर्मिती केली.
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु तुकाराम महाराज, नामदेव महाराज , शांतीब्रह्म एकनाथ महाराज , राष्ट्रगुरू समर्थ रामदास स्वामी महाराज आदि थोर संत येथे होऊन गेले. परमपूज्य अक्का वेलणकर या अशा आत्मज्ञानी संतांपैकी एक! मूळच्या भगवद्भक्त असलेल्या अक्कांचा ओढा घरातील सात्विक वातावरणामुळे अधिकाधिक भक्तीमार्गाकडेच दृढ होत गेला. रोखठोक स्वभाव, सखोल ज्ञानप्राप्तीची तळमळ, कुशाग्र बुद्धिमत्ता, शिस्तप्रियता असे त्यांचे विशेष गुण. त्यांना समर्थ संप्रदायी असलेल्या परमपूज्य भागीरथीबाई वैद्य यांनी अनुग्रहीत केले. पुढे आपल्या सद्गुरूंच्या आदेशाने अक्कांनी तीनशेपेक्षा जास्त भागवत सप्ताह केले. सुमारे ४५ प्रापंचिक महिलांना भागवत कथाकार म्हणून घडवले. त्या पत्रद्वारा दासबोध अभ्यास उपक्रमाच्या अनेक वर्षे केंद्रप्रमुख होत्या. उत्कट साधक निर्माण व्हावे म्हणून १९८४ साली त्यांनी दासबोध सखोल अभ्यासक्रमाची निर्मिती केली.
आपण फाउंडेशनच्या कार्यात यथानुशक्ती आर्थिक साहाय्याद्वारे सहभागी होऊ शकता. आपण दिलेल्या देणगीचा विनियोग संस्थेचे कार्य सर्वदूर पोचविण्यासाठी तसेच शिबीरे, प्रकाशनादी उपक्रमांच्या आयोजनासाठी केला जाईल.